close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

देशात त्रिशंकू परिस्थिती, राज्यात आघाडीला निम्या जागा - छगन भुजबळ

छगन भुजबळ यांचा दावा

Updated: May 22, 2019, 05:48 PM IST
देशात त्रिशंकू परिस्थिती, राज्यात आघाडीला निम्या जागा - छगन भुजबळ

नाशिक : राष्ट्रीय स्तरावर त्रिशंकू परिस्थिती राहणार असून राज्यात निम्या जागा आघाडीला मिळतील असा दावा छगन भुजबळ यानी केला आहे. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दावणीला बांधले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ईव्हीएमचा वापर न करण्याचीही भूमिका घेऊ असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. काही लोकांना विचारुन एक्झिट पोल काढले जातात. एक्झिट पोल करणाऱ्या संस्था आधी भाजपसाठी काम करत होत्या. न्यायलय, सीबीआय, मीडिया सगळ्यामध्ये सरकारची ढवळाढवळ आहे. हा २-३ दिवसाचा खेळ आहे. एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांना पोल घ्यायला सांगू. निवडणुका घ्यायची गरज नाही. ईव्हीएमचा शोध लावला त्यांनी देखील बॅलेट पेपरचा वापर सुरु केला. ईव्हीएम मशीनचा आग्रह आपण का करतो. असा आरोप देखील त्यांनी केला. 

'ईव्हीएमवर सारख्या गोष्टी हॅक होऊ शकतात. बॅलेट पेपर हॅक होऊ शकत नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे.' अशी मागणी त्यांनी केली आहे.