अशोक चव्हाणांनी घेतली उमा पानसरेंची भेट

साडे तीन वर्षं उलटूनही कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना यश येत नाही ही खेदाची बाब असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरात म्हटलंय.

Updated: Dec 1, 2017, 09:36 PM IST
अशोक चव्हाणांनी घेतली उमा पानसरेंची भेट  title=

कोल्हापूर : साडे तीन वर्षं उलटूनही कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना यश येत नाही ही खेदाची बाब असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरात म्हटलंय.

गोविंदराव पानसरे यांच्या घरी भेट देऊन पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरेंची अशोक चव्हाणांनी यावेळी विचारपूस केली. 

तपास अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे तपास रेंगाळला असून, याबाबत येत्या अधिवेशनात सरकरला जाब विचारणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

तसंच देशात एक प्रकारे वैचारिक सेन्सॉरशीप लावली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.