स्वतः सिलेंडर घेऊन आल्यावर एजन्सी देणार पैसे

गॅस सिलेंडरचा वापर दररोज प्रत्येक घरात केला जातो. तसेच 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 30, 2017, 07:32 PM IST
स्वतः सिलेंडर घेऊन आल्यावर एजन्सी देणार पैसे  title=

नवी दिल्ली : गॅस सिलेंडरचा वापर दररोज प्रत्येक घरात केला जातो. तसेच 

सरकार उज्वल योजनेत साऱ्यांना चूलीचा वापर न करता गॅस सिलेंडरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र जास्त करून लोक जे सिलेंडरचा वापर करतात त्यांना हे नियम देखील माहिती नाही. 
जर एखादी गॅस एजन्सी तुम्हाला सिलेंडरची होम डिलिव्हरी देत नसेल तर तुम्ही सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर एजन्सीकडून तुम्हाला एक रक्कम दिली जाते. आणि यासाठी तुम्हाला कोणताही एजन्सीवाला नाही बोलणार नाही 

काय आहे नियम?

तुमच्याकडे कोणत्याही एजन्सीचे कनेक्शन असेल तर तुम्ही त्याच्या गोडाऊनमधून स्वतः सिलेंडर आणू शकता. हे केल्यावर तुम्ही एजन्सीकडून १९ रुपये ५० पैसे परत आणू शकता. आणि कोणतीही एजन्सी ही रक्कम देण्यासाठी नाही बोलणार नाही. ही रक्कम दरवेळी डिलिवरी चार्ज म्हणून तुमच्याकडून आकारली जाते. सगळ्या एजन्सीची ही रक्कम ठरलेली आहे. महिन्या भरापूर्वी ही रक्कम बदलण्यात आली आहे. या अगोदर ही रक्कम १५ रुपये होती आता ती १९ रुपये ५० पैसे दिले जात नाही. 

पैसे न दिल्यास येथे करा तक्रार

कोणताही एजन्सी संचालक ही रक्कम देण्यासाठी नाकारू शकत नाही. तसे केल्यास तुम्ही १८००२३३३५५५ या नंबरवर कॉल करू शकता. आता ग्राहकांना सबसिडीचे १२ सिलेंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर नागरिकांना मार्केट दरात सिलिंडर खरेदी करावा लागतो. 

फ्रीमध्ये चेंज होऊ शकतो रेग्युलेटर 

जर तुमचे सिलेंडरचे रेग्युलेटर लिक असेल तर तुम्ही एजन्सीकडून फ्रीमध्ये बदलू शकता. यासाठी तुमच्याकडे एजन्सीचे सब्सिक्रिप्शन वाऊचर असणं गरजेचं आहे. त्या लीक रेग्युलेटरला स्वतःसोबत घेऊन जावे लागेल. त्यानंतर सब्सक्रिप्शन वाऊचर आणि रेग्युलेटरचा नंबर चेक केला जातो. दोन्ही नंबर मॅच झाल्यावर तुम्हाला रेग्युलेटर बदलून दिला जातो.