मुंबई : सकाळी 7 वाजता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. नागपूरमधून सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच बारामतीतून अजित पवार यांनी देखील मतदान केले आहे. तसेच साताऱ्यातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी देखील मदतानाचा अधिकार बजावला आहे. दिग्गजांच भविष्य आज मतपेटीत कैद होणार आहे.
विधानसभेसह सातारा लोकसभा पोटनिवडणूक आज होत आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी हे मतदान होत आहे. यासाठी एकंदर ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच १ लाख ३५ हजार व्ही व्ही पॅट यंत्रांची सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.
PM Modi: Elections are taking place for Haryana & Maharashtra assemblies. There are also by-polls taking place in various parts of India. I urge voters in these states & seats to turnout in record numbers & enrich the festival of democracy.I hope youngsters vote in large numbers. pic.twitter.com/w33672vyDX
— ANI (@ANI) October 21, 2019
Mumbai: A voter casts his vote at booth number 244-250 for the Malabar Hill assembly constituency. Mangal Prabhat Lodha for BJP and Heera Devasi for Congress are contesting from this constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/KTTBcwBZ1d
— ANI (@ANI) October 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीकरता ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी भारतात अनेक ठिकाणी बाय-पोल होत असल्याचे सांगितले. तसेच भरघोस मतांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. एवढेच नव्हे तर युवांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडा आणि विक्रमी मतदानाची नोंद करा असे देखील आवाहन केले आहे.