दहा रुपयांची नाणी गोळा करून तरुणाने भरली निवडणूक अनामत रक्कम

 एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० रुपयांच्या नाण्यांचा वापर केला 

Updated: Oct 7, 2019, 04:25 PM IST
दहा रुपयांची नाणी गोळा करून तरुणाने भरली निवडणूक अनामत रक्कम title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहर विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० रुपयांच्या नाण्यांचा वापर केला आहे. संतोष संभाजी साबदे असे या उमेदवाराचे नाव असून आणि वय अवघे २८ वर्षे आहे, साबदे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या बाजारात १० रुपयांचे नाणं कुठलेही व्यापारी तसेच बँकाही स्वीकारत नाहीत.  

ज्यांच्याकडे ही १० रुपयांची नाणी आहेत त्यांची मोठी अडचण होत होती. चलनात असणारे नाणं न स्वीकारण्याचा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी संतोष साबदे यांनी मतदारांना आवाहन करून १० रुपयांची नाणी देण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केलं. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. 

अनेकांनी आपल्या घरात पडुन असलेले १० रुपयांची नाणी संतोषकडे जमा केली. ज्यातून त्यांनी निवडणूक लढविण्यासाठीची अनामत रक्कम जमा केली. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर नियम दाखविल्यानंतर अनामत रक्कम म्हणून १० हजार रुपयांचे १० हजार नाणी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वीकारावीच लागली. 

ही नाणी मोजताना प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी चांगलीच दमछाक झाली. एकूणच काय तर निवडणूक प्रचार सुरू होण्याच्या आधीच २८ वर्षीय संतोष साबदेने १० रुपयांच्या चलनी नाण्याचा मुद्दा अधोरेखित करून आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचेच दिसून येत आहे.