पितृपक्ष संपल्यानंतर उद्या युतीची घोषणा होणार ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. 

Updated: Sep 28, 2019, 12:29 PM IST
पितृपक्ष संपल्यानंतर उद्या युतीची घोषणा होणार ?  title=

मुंबई : भाजपा-शिवसेना यांच्यात युती होणार की नाही ? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत माहीती समोर आली नाही. जागावाटपात कोण बाजी मारणार ? मुख्यमंत्री कोणाचा होणार ? काही महत्त्वाच्या जांगावरील राहीलेली चर्चा यामुळे युतीचं घोडं अद्याप अडलेलं आहे. पण आता युतीच्या घोषणे संदर्भात नवीन माहीती समोर येत आहे. युतीची घोषणा पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे उद्या होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. 

युती झाल्यानंतर तसंच उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत बंडखोर तसंच नारांजांची संख्या वाढू नये, याची काळजी शिवसेना घेत आहे. या मेळाव्यातून संदेश देण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीत सेना उमेदवाराला कुठलाही दगाफटका होवू नये, याच्या सूचनाही दिल्या जातील. 

तसंच युती झाल्यास मित्रपक्ष भाजपच्या उमेदवारासाठीही प्रामाणिकपणे काम करण्याच्या सूचना दिल्या जातील. या मेळाव्यासाठी सर्व जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आलंय. सकाळी ११ वाजता मेळाव्याला सुरूवात होणार आहे.