एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर ब्लेडने वार

सांगली जिल्ह्यातील जत येथे एकतर्फी प्रेमातून नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Shubhangi Palve Updated: Apr 7, 2018, 11:58 PM IST
एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर ब्लेडने वार title=

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत येथे एकतर्फी प्रेमातून नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या हल्ल्यानंतर घाबरलेल्या हल्लेखोर कृष्णा पिसाळ याने स्वतःचा गळा चिरला असून, हाताची नस सुद्धा कापून घेतली आहे. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी मुलीच्या गळ्यावर ३५ टाके घातले आहेत... तर हल्लेखोर कृष्णा पिसाळच्या गळ्यावर २५ आणि हातावर ५ टाके घालण्यात आले आहेत.