नागपूर : कायदा आणि सुव्यवस्था किती चिंताजनक बनलीय हे पुन्हा एकदा समोर आलंय. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुमारे सहा ते आठ गुंडांनी महाअन्नपूर्णा रेस्टॉरन्टवर सशस्त्र हल्ला केलाय. मंगळवारी रात्रीच्या या घटनेत गुंडांनी सशस्त्र धिंगाणा सुरु असतानाच रेस्टॉरंटमधील ग्राहक प्रचंड दहशतीमध्ये होते. हल्लेखोर गुंड तलवार हातात घेऊन फिरवत होते.
गुंडांच्या या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झालाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. हा हल्ला सुरु असताना रेस्टॉरंटच्या कर्मचा-यांनी प्रतिकार केला असता हे हल्लेखोर पसार झाले.याप्रकणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.