औरंगाबाद : Aurangabad Bench has once again given strikes to Minister Abdul Sattar : औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एकद मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना झटका दिला आहे. सत्तार महसूल राज्य मंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. संभाजी नगर बाजार समितीची जिन्सी भागातील 15,645 चौरस मीटर जागा आहे. तिचा व्यवहार 21.75 कोटीत झाला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयानेही व्यवहाराला मान्यता दिली असताना तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती. बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र मंत्र्यांनी नियम डावलून घेतलेल्या या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देत सत्तार यांना दुसऱ्यांदा दणका दिला आहे.
सोबतच सत्तार यांच्याकडे वेगवेगळ्या जमिनींच्या चौकशीसाठी वारंवार अर्ज करणाऱ्या डॉ. दिलावर मिर्झा बेग या व्यक्तीची विभागीय आयुक्तांनी चौकशी करून 26 सप्टेंबर रोजी अहवाल सादर करावा. तोपर्यंत विद्यमान महसूलमंत्री व राज्यमंत्री यांनी या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये, असेही खंडपीठाने बजावले आहे. वर्षभरापूर्वीही 50 कोटींच्या एका जमिनीच्या व्यवहारात सत्तार याना कोर्टात माफीनामा सादर करावा लागला होता.
जिन्सी येथील बाजार समितीचा हा भूखंड शौर्य असोसिएट्सने निविदा भरून 21 कोटी 75 लाख रुपयांत खरेदी केला होती. या जमिनीचा बाजार समिती, फुलफगर नावाचा व्यक्ती आणि शौर्य असोसिएट्स यांच्यात वाद होता. आधी दिवाणी न्यायालयात नंतर जिल्हा न्यायालयाने तो निकाली काढून व्यवहाराला मंजुरी दिली. मात्र यानंतर दोन महिन्यांनी वरुड (काजी) येथील डॉ. दिलावर मिर्झा बेग यांनी या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याची तक्रार तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. सत्तारांनी लागलीच चौकशी लावली.
त्यामुळे बाजार समितीने रजिस्ट्रीची पुढील कार्यवाही केली नाही. त्यामुळे शौर्य असोसिएट्सने पुन्हा कोर्टात धाव घेतली. कोर्टाने मंजुरी दिल्यानंतरही राज्यमंत्री सत्तार यांनी चौकशी आदेश दिले. हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे, असे त्यांचे म्हणणे होते. बाजार समिती संचालक आणि शौर्य असोसिएट्सने त्यांच्या तक्रारीनंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्तार यांच्या आदेशाला स्थगिती दिली.
मात्र डॉ. दिलावर मिर्झा बेग यांनीही थोरात यांच्या निर्णयास खंडपीठात आव्हान दिले. तत्कालीन संचालकांनीही याचिका दाखल केली होती. दोन्ही याचिकांची सुनावणी खंडपीठासमोर झाली. तेव्हा न्यायालयाने सत्तार यांच्या आदेशाला स्थगिती दिली. तसेच बाळासाहेब थोरात, सत्तार आणि डॉ. बेग यांना नोटीसा बजावण्याचे आदेश दिले.
तसेच याआधी शिक्षक भरती घोटाळ्यातही त्यांचे नाव पुढे आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींनी बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळवत शिक्षकाची नोकरी मिळवली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिक्षक यादीत होती. त्यामुळे सत्तार हे आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.