close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हे कसले वारकरी? दोन बिस्किटं चोरून खाल्ली म्हणून चिमुरड्याला क्रूर शिक्षा

असल्या महाराजांच्या ताब्यात मुलांना देण्याआधी पालकांनो, शंभर वेळा विचार करा...

Updated: Jul 17, 2019, 09:30 PM IST
हे कसले वारकरी? दोन बिस्किटं चोरून खाल्ली म्हणून चिमुरड्याला क्रूर शिक्षा

विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : चोरून दोन बिस्कीटं खाल्ली म्हणून एका चिमुकल्याला अमाऩुष मारहाण करण्यात आलीय. या मुलाला किती लागलंय, हे आल्यावर तुम्हालाही धक्का बसेल... औरंगाबादमधल्या निल्लोडच्या 'माऊली वारकरी संस्थे'च्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. अवघ्या आठ वर्षांच्या निरंजनला भूक लागली म्हणून त्यानं दुसऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगेजवळ ठेवलेला बिस्किटांचा पुडा घेतला आणि त्यातली दोन बिस्किटं खाल्ली. संस्थाचालक रामेश्वर पवार या महाराजाला हे कळताच त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यानं निरंजनला बेदम मारहाण केली. 

निरंजनच्या पाठीवर स्पीकरच्या वायरनं मारहाण करण्यात आलीय. निरंजनच्या डोक्यालाही दुखापत झालीय. हे सगळं घडल्यावर निरंजनवर उपचारही करण्यात आले नाहीत, असं निरंजनची आई वैशाली जाधव यांनी म्हटलंय. 

धक्कादायक म्हणजे स्वत:ला वारकरी म्हणणारा, विद्यार्थ्यांना भक्तिमार्गाचं प्रशिक्षण देणारा 'महाराज' (?) नेहमीच विद्यार्थ्यांना मारहाण करतो, असं विद्यार्थी सांगतात. या प्रकरणी रामेश्वर महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

असल्या महाराजांवर कठोर कारवाई व्हायला हवी. असल्या महाराजांच्या ताब्यात मुलांना देण्याआधी पालकांनो, शंभर वेळा विचार करा...