औरंगाबादमध्ये नाल्यात बुडून एकाच मृत्यू; उपायुक्त निलंबीत

महापालिका उपायुक्त रविंद्र कदम निलंबीत, महापालिका आयुक्तांनी केली कारवाई 

Updated: Jun 20, 2018, 11:23 AM IST

औरंगाबाद: शहरातील जयभवानी नगर भागात एकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित करण्यात आलंय. रात्री झालेल्या पावसामुळे नाला न दिसल्याने भगवान मोरे नाल्यात पडले. दूध घेऊन घरी जात असताना हा प्रकार घडला. या भागात नाल्यावर लोकांनी अतिक्रमण केलंय. ती तोडण्याबाबत महापालिका प्रशासनाने उदासीनता दाखवल्याने निष्पाप नागरिकाचा बळी गेला.

महापालिका आयुक्तांची उपायुक्तांवर कारवाई

धक्कादायक बाब म्हणजे अतिक्रमण तोडून तसेच अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आलं होतं. त्याच खड्ड्यात पडून भगवान मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ही नाल्यावरील अतिक्रमणं हटविण्याची मागणी स्थानिक नगरसेवक आणि नागरिक करत होते. मात्र महापालिका प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यामुळेच उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित करण्यात आलंय. महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केलीय.