प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : भाजपाचे माजी आमदार बी.एस.पाटील यांनी त्यांना झालेल्या हाणामारीवर, तसेच त्यांनी आमदार स्मिता वाघ यांच्यावर, पारोळ्यात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. बी एस पाटील यांच्यावर धुळ्यात एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये काल भाजपाच्या मेळाव्यात, माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण झाली होती. (व्हिडीओ पाहा बातमीत)
'पक्षातील इतर मंडळी सुसंस्कृत आहेत, मात्र उदय वाघ या दोन टर्म जिल्हाध्यक्ष झाल्यापासून गुंडाप्रमाणे वागायला लागला आहे. वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रारी केल्या, पण कुणीही लक्ष दिलेलं नाही, हा माझा आरोप आहे' - माजी आमदार डॉ. बी एस पाटील
'जोपर्यंत जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना त्या पदावरून हटवत नाहीत, तोपर्यंत अमळनेरचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, म्हणजेच कोणताही कार्यकर्ता उमेदवाराचा प्रचार करणार नाही ही आमची भूमिका आहे.' - माजी आमदार डॉ. बी एस पाटील