राजेश टोपेंच्या मुखड्यामुळं तीन लाख लोकांचा मृत्यू; भाजप आमदाराचा गंभीर आरोप

राजेश टोपे यांच्या मुखड्यामुळं महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. 

Updated: Nov 6, 2022, 07:10 PM IST
राजेश टोपेंच्या मुखड्यामुळं तीन लाख लोकांचा मृत्यू; भाजप आमदाराचा गंभीर आरोप title=

नितेश महाजन, झी मिडिया, जालना : भाजप आमदार बबनराव लोणीकर(BJP MLA Babanrao Lonikar) यांनी महाविकास आघाडीवर(Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे(NCP leader and former health minister Rajesh Tope) यांच्यावर बबनराव लोणीकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कोरोनामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला. या सर्वांच्या मृत्यूला राजेश टोपे जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा बबनराव लोणीकर यांनी केला आहे(Maharashtra Politics). 

राजेश टोपे यांच्या मुखड्यामुळं महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये धन्यवाद मोदीजी अभियानाची माहिती देण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन करताना बबनराव लोणीकर बोलत होते.

महाआघाडी सरकारनं ग्लोबल टेंडर नावाचा इंग्रजी शब्द आणला 

महाआघाडी सरकारनं ग्लोबल टेंडर नावाचा इंग्रजी शब्द आणला आणि सहा हजार कोटींची लस विकत घ्यायची अशी घोषणा करण्यात आली. तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा मुखडा रोज टीव्हीवर दिसायचा. नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी... असा यांचा कारभार होता.

लबाड लांडगं ढोंग करतं, लस आणण्याचं सोंग करतय

महाराष्ट्रात कोरनामुळे तीन लाख लोकांचा  मृत्यू झालाय. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आघाडी सरकारनं जनतेची फसवून केली.एकही लस विकत घेतली नाही असं बबनराव लोणीकर म्हणाले.  लबाड लांडगं ढोंग करतं, लस आणण्याचं सोंग करतय असं म्हणत लोणीकर यांनी राजेश टोपेंवर टीका केली.