महाविकासआघाडीची 2 लाखांची कर्जमाफी फक्त बुजगावणं - राज्यमंत्री बच्चू कडू

महाविकासआघाडीत मंत्री असणाऱ्या बच्चू कडूंची सरकारवर टीका

Updated: Feb 9, 2020, 01:50 PM IST
महाविकासआघाडीची 2 लाखांची कर्जमाफी फक्त बुजगावणं - राज्यमंत्री बच्चू कडू title=

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. तर बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. त्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

'अब्दूल सत्तार यांना सरकारमधून बाहेर पडा असं सांगण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपले अधिकार तपासावे.' असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांना किती लुटलं याचा हिशोब काढला तर आमचेच पैसे सरकारकडे निघतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली.