'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत. 

सौरभ तळेकर | Updated: May 21, 2024, 04:58 PM IST
'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले... title=
Bacchu Kadu On Sachin Tendulkar

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर विरोधात आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेत. ऑनलाईन गेममुळेच सचिनच्या अंगरक्षकानं (Sachin tendulkar Bodyguard) आत्महत्या केल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय. त्यामुळे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी ऑनलाइन गेमची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. अन्यथा 6 किंवा 7 तारखेला सचिन तेंडुलकरच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार असा इशारा देखील बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिलाय. त्यामुळे आता प्रकरण आणखी पेटणार का? असा सवाल विचारला जातोय.

भारतरत्न असणाऱ्या सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करु नये, म्हणून आम्ही खुप विनंती केली. प्रसंगी त्याच्या घराबाहेर आंदोलनही केले. परंतू तेंडुलकरने भारतरत्न पुरस्काराची मर्यादा न पाळता ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सुरूच ठेवली. काल याच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे प्रकाश कापडे (Prakash kapde) या सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने स्वतःचे जीवन संपवले. सचिन आतातरी जागा हो, अशी पोस्ट बच्चू कडू यांनी केली होती.

सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. प्रकाश कापडे (Prakash Kapde) असं मृत जवानाचं नाव असून त्यांनी आपल्या राहात्या घरी डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश कापडे हे जळगावच्या जामनेरमध्ये राहत होते. बुधवारी पहाटे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. प्रकाश कापडे हे गेल्या 15 वर्षांपासून SRPF मध्ये कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते नारायण राणे यांच्याही सुरक्षेतही काम केलं आहे.  

दरम्यान, क्रिकेट ज्यांचा धर्म आहे... सचिन तेंडुलकर त्यांचा देव आहे... क्रिकेटमधला विक्रमादित्य... भारतरत्न... शांत स्वभावाचा सचिन तेंडुलकर... टीकाकारांनाही त्यानं आपल्या बॅटनेच उत्तर दिलं. मात्र, सचिनने कधीही कोणावर आरोप किंवा स्वत: टीकेचा धनी झाला नाही. मात्र, हाच क्रिकेटचा देव आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.