पेरणीनंतर आठवडा उलटला, तरी कोंब काही फुटेना!

एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, दुसरीकडे मात्र शेतक-याला मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.

Updated: Jul 4, 2017, 07:13 PM IST
पेरणीनंतर आठवडा उलटला, तरी कोंब काही फुटेना! title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, दुसरीकडे मात्र शेतक-याला मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.

नागपूर जिल्ह्यातील वारंगा गावातीस शेतीकरी असलेल्या दीपक घायवडने यांनी `कॅश क्रॉप' अशी ओळख असलेले सोयाबीनचे पीक घेण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे बियाणे विकत घेतले. ३९० रुपयाला एक या प्रमाणे २ बॅग या तरुण शेतकऱ्याने विकत घेतले. मान्सूनची पहिली सर कोसळल्यानंतर त्याने पेरणी केली. पण पेरणी झाल्यावर ९ दिवस झाले तरीही कोंब फुटले नाही. 

पेरणी केल्यानंतर सहाव्या दिवशी बियाण्याला कोंब फुटते हा निसर्गाचा नियम आहे. पण तसे दिपकच्या बाबतीत मात्र झाला नाही आणि त्याची भीती खरी ठरली. त्याने विकत घेतलेले दोन्हीही बॅगमधील बियाणे निकृष्ट दर्जाचे होते. दीपक एकटा नव्हता तर तो राहतो त्या वारंगा गावात अनेक शेतकऱ्यांची हीच तक्रार आहे.  

निष्कृष्ट दर्जाचे बियाणं

नागपूरच्या या बियाणे परीक्षण केंद्रात शेती संबंधी बियाणांचे परीक्षण होते. या वर्षी येथे सोयाबिनचे बियाणे मोठ्या प्रमाणात परीक्षणाकरता आले आहेत. या प्रयोग शाळेत आलेल्या बियाण्यांच्या एकूण नमुन्यांपैकी सुमारे ४० % बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले असून तसा अहवाल येथील अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या निकृष्ट दर्जाचे बियाणांच्या प्रमाण वाढल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. महत्वाचे म्हणेज विकत घेतलेले बियाणे चांगले आहे कि निकृष्ट दर्जाचे हे जाणून घेण्याचे कुठलेही मापदंड नसून प्रयोगशाळेत परीक्षण झाल्यावरच बियाण्याचा दर्जा निश्चित होतो. 

विदर्भात सुमारे २० लाख एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होत असल्याने या भागातील हे एक प्रमुख पीक आहे. त्यामुळे निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत येऊ नये, याकरता संबंधी यंत्रणेने पाऊले उचलण्याची गरज आहे.