बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम

  बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 23, 2024, 08:45 PM IST
बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम title=

Badlapur Accused Akshay Shinde:  बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. 

20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आल्यानंतरएकच खळबळ उडाली. सफाई कर्मचारी अक्षय शिंदे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. त्याने दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. 

यानंतर बदलापूर स्थानकावर जनतेचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले.

22 ऑगस्ट 

आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आली. 

3 सप्टेंबर 

दोन अल्पवयीन मुलींनी ओळख परेड दरम्यान अक्षय शिंदेला ओळखले.सुमोटो याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

23 सप्टेंबर 

तळोजा जेलमध्ये बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय.आरोपी अक्षय शिंदेने जेलमधल्या पोलिसांकडून रायफल हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. याच झटापटीत एक गोळी अक्षय शिंदेला लागली तर एक गोळी पोलिसावाल्यालाही लागलीय.अक्षय शिंदेची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.. अक्षय शिंदेची कोठडी आजची संपली होती. त्यासाठी त्याला कोर्टात घेऊन जाणार होते.पण अक्षयने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी घालून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

आज काय घडलं?

- पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) नेत असताना हा सगळा प्रकार घडला. 
- सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या. 
- अक्षय शिंदेने पोलीस अधिकीर निलेश मोरे यांचीच बंदूक खेचली होती. 
- मुंब्रा बायपासजवळ हा सगळा प्रकार घडला आहे. 
- या झटापटीत पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले. 
- यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता. 
- त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे त्याचा मृत्यू झाला. 
- दरम्यान हा ठरवून केलेला एन्काऊंटर होता का? अशी विचारणा विरोधक करत आहेत. 
- याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.