शिवसेनाप्रमुखांच्या मुलाखतींचा संग्रह असेलेल्या 'एकवचनी' चे प्रकाशन

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतींचा द्विखंडीय संग्रह ‘एकवचनी’चा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 19, 2017, 08:23 PM IST
शिवसेनाप्रमुखांच्या मुलाखतींचा संग्रह असेलेल्या 'एकवचनी' चे प्रकाशन title=

मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतींचा द्विखंडीय संग्रह ‘एकवचनी’चा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

या पुस्तकामध्ये सामानाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक घेतलेल्या मुलाखतींचे संकलन करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या १०० मुलाखतींचे वाचन या पुस्तकातून होणार आहे. 

 'एकवचनी' नावाच्या या पुस्तकाच्या प्रकाशानासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची विशेष उपस्थिती होती.

याशिवाय शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेक दिग्गज हजर होते. 

 यावेळी जेटलींनी बाळासाहेबांच्या संवाद कौशल्याची तुलना गांधींजींशी केली. लोकमान्य टिळकांनी जसा लोकसंग्रह केला तसाच बाळासाहेबांनी केल्याचे उद्धव ठाकरेंनी  यावेळी म्हटले आहे.