Bank Of Maharashtra Bharti: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. बॅंकेत नोकरी करायची असेल तर आधी त्यासंदर्भातील शिक्षण आवश्यक आहे. शिकता शिकता तुम्हाला जर कोणी पगारही देत असेल तर आणखी काय हवं? बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला ही संधी देत आहे. येथे देशभरातून 600 शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, स्टायपेंड याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये शिकाऊ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेली असावी.ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात प्रशिक्षणार्थी निवड केली जाईल त्या स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान संबंधित उमेदवाराला असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील उमेदवारांना मराठी भाषणा येणे आवश्यक आहे. अर्ज करतावेळी उमेदवाराने दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल.
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये शिकाऊ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://nats.education.gov.in/ वर जावे. येथे जाऊन राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर नोंदणी करावी. NATS पोर्टलवर प्रोफाइल पूर्ण भरावे. प्रोफाइल पूर्ण असलेले उमेदवारच बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्यास पात्र असतील, याची नोंद घ्या.
30 जून 2024 रोजी अर्जदारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
अप्रेंटीस पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराल एका वर्षाच्या कालावधीसाठी काम करता येईल. या कालावधीसाठी उमेदवारांना दरमहा 9 हजार रुपये स्टायपेंड मिळेल. उमेदवारांना या स्टायपेंड व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त लाभ किंवा भत्ते दिले जाणार नाहीत.
शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अनारक्षित, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क अधिक GST भरावा लागेल. एससी, एसटी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कात 50 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क अधिक GST भरावा लागेल. पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोणतेही अर्ज शुल्क नाही.
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटीस पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात.
वेबसाइटवरील अर्ज करण्याची विंडो 24 ऑक्टोबर 2024 रोजी बंद होईल. यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा अपूर्ण अर्ज असल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.