'डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई चुकीची'

अर्बन बॅंक महासंघ कायदेशीर लढाई लढणार

Updated: Jun 23, 2018, 10:29 PM IST
'डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई चुकीची' title=

पुणे : डीएसके प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संचालक तसंच अधिकार्यांवर झालेली कारवाई अनाकलनीय तसेच चुकीची असल्याचं बॅंकिंग तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या संदर्भात काही गैर घडलं असल्यास रिझर्व्ह बॅंक कारवाई करू शकते, पोलिसांना तो अधिकार कोणी दिला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे यांच्यासह बॅंकेशी संबंधित चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यातील इतर बॅकाच्या संचालकांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बँकांच्या संचालकांना संरक्षण मिळण्याचा दृष्टीने कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही अर्बन बॅंक महासंघातर्फे सांगण्यात आलं आहे.

त्याविषयी महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे यांनी. पाहा व्हिडिओ