बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?

Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती (Baramati Politics) यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. आता या लढाईत थेट शरद पवारच मैदानात उतरले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Feb 27, 2024, 07:33 PM IST
बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'? title=
Baramati Politics In Sharad Pawar Family

Baramati Politics : बारामती लोकसभेची निवडणूक यंदा प्रचंड प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशीच संभाव्य लढत होण्याची दाट शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati loksabha Election) थेट अजित पवारच मैदानात उतरल्याने सुप्रिया सुळेंसाठी ही लढाई सोपी नाही. सुप्रिया सुळेंची लोकसभेची वाट खडतर बनलीय. हे स्वत: शरद पवारही जाणून आहेत. म्हणूनच आता लेकीसाठीच थेट शरद पवार बारामतीच्या (Baramati News) मैदानात उतरले आहे.

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) ही संभाव्य लढत पाहता शरद पवारांनी स्वत: बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घालायचं ठरवलंय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिका-यांची स्वत: बैठक घेतली... साडेपाच तास सलग एकाच जागेवर बसून मतदारसंघाचा जातीने आढावा घेतला.

बारामती, पुरंदर, भोर, इंदापूर, दौंड आणि खडकवासला मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवारांनी बैठक घेतली. बारामतीसाठी भाजपने ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती अशी स्लोगन वापरली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला कसलीच चिंता नव्हती, कारण अजित पवारांची ताकद... 2019 मध्ये सुप्रिया सुळे दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या होत्या.. तेव्हा प्रचाराची सर्व धुरा स्वत: अजित पवारांकडे होती.

बारामती लोकसभेतला खडकवासला, दौंड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. पुरंदर आणि भोरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. बारामती आणि इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. बारामतीत स्वत: अजित पवार आमदार आहेत. तेव्हा बारामतीच्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत. तेव्हा आता समीकरणं बदलली आहेत. 

महायुतीत गेलेले अजित पवारच सुप्रिया सुळेंविरोधात (Ajit Pawar vs Supriya Sule) उतरल्याने लढाई आणखी कठीण बनलीय. अजित पवार बारामतीमध्ये पायाला भिंगरी लावून सभा घेतायत. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढतायत.. अशा वेळी लेकीला जिंकवायचं तर आपल्यालाच मैदानात उतरावं लागणार हे शरद पवारांना (Sharad Pawar) ठावूक आहे.