काय चाललंय पुण्यात... हातात कोयते घेऊन मारहाण; मुलींची, महिलांची छेड

धक्कादायक बातमी. भरदिवसा गुंडगिरी. पुणे शहरात गुंडांनी हैदोस घातला आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात आहे.  

Updated: Apr 3, 2022, 08:21 AM IST
काय चाललंय पुण्यात... हातात कोयते घेऊन मारहाण; मुलींची, महिलांची छेड title=

पुणे : धक्कादायक बातमी. भरदिवसा गुंडगिरी. पुणे शहरात गुंडांनी हैदोस घातला आहे. पुण्यात शहरात हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात आहे. 'झी 24 तास'च्या हाती हा धक्कादायक व्हिडिओ लागला आहे. मात्र पोलीस या गुंडांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

बालाजीनगर परिसरात धारदार हत्यारं घेऊन दहशत पसरवली जात आहे. हातात कोयते घेऊन मारहाण केली जात आहे. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जातेय. लोकांना पाया पडायला लावलं जातंय. आणि तो व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरवली जातेय. बालाजीनगरमध्ये मारहाण, मुलींची, महिलांची छेड या गोष्टी नित्याच्या झाल्यात. 

नागरिकांनी सहकारनगर पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रार केली. पण पोलीस कोणताही प्रतिसाद देत नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या गुंडांना नेमकं कोण पाठिशी घालत आहे, असा सवाल विचारला जात आहे. तक्रार द्यायला आलेल्या नागरिकांनाच उलट सहकारनगर धनकवडी भागातून तुम्ही जाऊ नका, असे संतापजनक उत्तर पोलीस नागरिकांना देत आहेत.