बैलगाडी शर्यत स्पर्धेत चिअर गर्ल्सचं अधिक आकर्षण

Cheer girls more attraction in bullock cart race : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पांगरीत बैलगाडा थर्यतीत चिअर्स गर्ल्स थिरकल्या.  

Updated: Apr 3, 2022, 08:00 AM IST
बैलगाडी शर्यत स्पर्धेत चिअर गर्ल्सचं अधिक आकर्षण title=

पुणे : Cheer girls more attraction in bullock cart race : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पांगरीत बैलगाडा थर्यतीत चिअर्स गर्ल्स थिरकल्या. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चिअर गर्ल्स पहिल्यांदा दिसल्यात. त्यानंतर या चिअर गर्ल्स अनेक इव्हेंटमध्ये दिसून येत आहेत. आता तर बैलगाडी शर्यतीत या चिअर गर्ल्स दिसल्याने यायीच जास्त चर्चा होती.

रोकडोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नववारी साडी नाकात नथ घालत मराठमोळा साज परिधान करून या चिअर गर्ल्स पहिल्या नंबरमध्ये येणाऱ्या बैलगाड्याच्या बारीनंतर मराठी गाण्यांवर थिरकलेल्या पाहायला मिळाल्या.

बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रेतील बैलगाडी शर्यतीत चिअर गर्ल्स थिरकल्याने बैलगाडा घाटातील सर्वांचेच लक्ष या तरुणीकडे वेधले गेले होते. बैलगाडा शर्यतीत चिअर गर्ल्स नाचल्याचे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.