एकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलं! वरातीऐवजी काढावी लागली अत्यंयात्रा, घटना वाचून धक्का बसेल

लग्नाचं आमंत्रण मिळालं, पण झालं अस की लग्नघरात सनईऐवजी ऐकू आला आक्रोश; जमला सारा गाव

Updated: Nov 26, 2022, 11:57 PM IST
एकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलं! वरातीऐवजी काढावी लागली अत्यंयात्रा, घटना वाचून धक्का बसेल title=

राज्यात लग्नसराईचा (Marriage) माहोल आहे. अनेक ठिकाणी लग्नाचे सनई चौघडे वाजतात. संपुर्ण राज्यभरात लग्नाचा माहोल बनलेला आहे. त्यात एक दुःखद घटना समोर आली आहे. या घटनेत तरूणाच लग्न ठरलं होतं.पत्रिका देखील (wedding card) वाटल्या गेल्या होत्या. मात्र लग्नासाठी अवघे काही दिवस उरले असताना तरूणाचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण गाव हळहळ व्यक्त करतंय. 

हे ही वाचा : आता एवढच पाहायच राहिल होतं...हॉटेलच नाव पाहून नेटकरी असं काय म्हणतायत?

बीड (Beed) मधल्या अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाचं येत्या 18 डिसेंबर 2022 रोजी लग्न ठरलं होते. या तरूणाचे नाव धीरज वसंत तट होते, तो एक स्थापत्य अभियंता होता. हा तरूण एकूलता एक होता, त्यामुळे कुटूंबामध्ये लग्नाचा (Marriage)  एक वेगळा उत्साह होता. लग्नाची बोलणी देखील झाली होती. पत्रिका देखील वाटण्यात आली होती. परंतु नियतीला काही औरच मान्य होतं.

हे ही वाचा : बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ 

घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरु होती. नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण (wedding card) देण्यात आले होते. सर्व काही उत्साहात सुरु होते. मात्र या दरम्यानच नवरदेव असलेल्या धीरज वसंत तट याला हृदय विकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला. यावेळी त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यानचं त्याचा मृत्यू झाला. या घटनेने तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या तरूणाच्या लग्नासाठी (Marriage) नातेवाईकांना एकत्र जमायचे होते त्या नातेवाईकांना त्यांच्या अंत्यविधीसाठी जमण्याची दुदैवी वेळ आली होती.  तसेच ज्या मुलीने लग्नासाठी स्वप्न रंगवली होती, तिचा संसार उभा होण्याआधीच मोडला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.