डेंग्यूचं थैमान, बीडमधल्या इंजिनिअर तरुणीचा मृत्यू

बीडमधील अंबाजोगाई शहर आणि परिसरात डेंग्यूनं थैमान घातलंय.

Updated: Sep 19, 2018, 09:13 PM IST
डेंग्यूचं थैमान, बीडमधल्या इंजिनिअर तरुणीचा मृत्यू title=

बीड : बीडमधील अंबाजोगाई शहर आणि परिसरात डेंग्यूनं थैमान घातलंय. रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयं खचाखच भरलीत. मंगळवारी दुपारी एका अभियंता तरूणीचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याने प्रश्नाचं गांभीर्य आणखीन वाढलंय. राखी वैष्णव असं या तरूणीचं नाव आहे. स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मागील आठवड्यातचं अंजनपूर कोपरा येथील एका व्यक्तीचा डेंग्यूनं मृत्यू झाला होता.

स्वाईन फ्लूचाही धोका 

एकीकडे डेंग्यूंनं थैमान घातलेलं असतानाच स्वाईन फ्लूनंही डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लू धोका दिवसेंदिवस वाढतोय. हवामानातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण झपाट्यानं वाढताय. गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण स्वाईन फ्लू तिघांचा बळी घेतलाय. 

वर्षाच्या सुरुवातीपासून नाशकात एकूण २५ जण स्वाईन फ्लूनं मृत्यूमुखी पडलेत. राज्यभरात एकूण ५५ जणांचा बळी गेलाय. तिकडे सांगलीतही गेल्या दीड महिन्यात सात जण स्वाईन फ्लूमुळे दगावलेत. गेल्या १५ दिवसांत स्वाईन फ्लूचे १४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी ७ रूग्ण दगावले. आरोग्य यंत्रणेने याची गंभीर दखल घेत घरोघरी सर्वेक्षण सुरू केलंय. स२४ वैद्यकीय पथकं, ८३ स्क्रिनींग सेंटर्स, आणि १०२ आणि १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. सर्व 59 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 15 ग्रामीण रुग्णालयांमध्ये टॅमिफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा आहे.