महाराजांचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांना... उदयनराजे भोसले संतापले

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं, Udayanraje Bhosle यांनी दिला इशारा

Updated: Nov 21, 2022, 01:38 PM IST
महाराजांचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांना... उदयनराजे भोसले संतापले title=

Maharashtra Politics : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीये. शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या त्रिवेदींना पक्षातून काढावं अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना विस्मरण होत असून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी माझी भूमिका योग्य वेळ आल्यावर जाीर करेने असा इशाराच उदयनराजे यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकावं, सरकारला हे जमत नसेल तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही ठरवू असं म्हणत उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेद यांना इशारा दिला आहे. 

विरोधकांची टीका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यात वातावरण तापलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यपालांचा बचाव केल्याचं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपसह राज्यपालांवर निशाणा साधलाय. शिवरायांवर भाजपचं खोटं प्रेम आहे म्हणून ते राज्यपालांचा बचाव करत असल्याचं म्हटलंय. तर छत्रपतींचा अपमान करणा-यांचा पाठराखण करणं दुर्दैवी असून, भाजपला छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

कायदा बनवावा - संभाजी राजे
राज्यपाल आणि प्रवक्त्यांची फडणवीस पाठराखण करतायत का?' असा सवाल संभाजी राजेंनी (Sambhajiraje Chatrapati) उपस्थित केलाय. याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवरायांच्या अपमानजनक भाष्यावर आपली भूमिका मांडावी आणि महापुरूषांचा अपमान होणार नाही असा कायदा बनवावा अशी मागणी त्यांनी केलीय...

ठाकरे गट आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल आणि भाजपच्या प्रवक्त्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात आंदोलन केलं. राज्यपालांचा फोटो लावलेले खोके ठाकरे गटानं मुंबईच्या समुद्रात फेकत त्यांचा निषेध केला. तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा फोटो लावलेले खोकेही समुद्रात फेकण्यात आले.