"राज्यपाल काहीतरी बोलतात आणि फडणवीस पाठराखण करतात"; पंतप्रधांनाचा उल्लेख करत छत्रपती संभाजीराजेंची टीका

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून त्यांचा निषेध नोंदवला जात आहे. ठाकरे गटाने राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केलीया

Updated: Nov 21, 2022, 12:22 PM IST
"राज्यपाल काहीतरी बोलतात आणि फडणवीस पाठराखण करतात"; पंतप्रधांनाचा उल्लेख करत छत्रपती संभाजीराजेंची टीका title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांविरोधात जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाने राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपाने राज्याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) राज्यपालांच्या बोलण्याचे अर्थ  वेगवेगळे अर्थ काढण्यात आले असे म्हटले आहे. यावर आता छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी फडणवीस हे अशी वक्तव्ये करणाऱ्यांची पाठराखण करत आहेत असे म्हटले आहे.

"देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया मी पाहिली. देवेंद्र फडणवीस त्यांना का पाठीशी घालत आहेत? फडणवीस हे अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहेत. त्यांच्या पक्षातील माणूस आहे म्हणून पाठराखण केली जात आहे का? देवेंद्र फडणवीसांनी ते प्रवक्ते शिवभक्तांची माफी कशी मागतील हे पाहणे महत्त्वाचे आहे," असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय.

हे ही वाचा >> शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्याला कापून फेकले पाहिजे; उदयनराजे भडकले

"पंतप्रधानांनी याची स्पष्टता द्यायला हवी की हे काही तरी बोललात आणि देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करतायत. हे शोभनीय नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत बोलायला हवं. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कुणी करू नये यासाठी राज्यात कायदा झाला पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या अपमानजनक भाष्यावर आपली भूमिका मांडली पाहिजे असेही असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

हे ही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण, आता मात्र.... राज्यपाल कोश्यारी असं का म्हणाले?

राज्यपालांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले होते?

"जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहेl तो पर्यंत महाराष्ट्र आणि देशाच्या आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजच हिरो आहेत याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही. राज्यपालांच्या बोलण्याचे अर्थ निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहे. मला वाटत की, त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श देशात आणि महाराष्ट्रात असू शकत नाही," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.