भंडारा रुग्णालय जळीतप्रकरण : फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा

१० नवजात बालकांनी आगीत गमावला जीव 

Updated: Jan 25, 2021, 08:12 AM IST
भंडारा रुग्णालय जळीतप्रकरण : फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा

मुंबई : भंडारा रुग्णालय जळीतप्रकरणी (Bhandara Hospital Fire Case)  आज भाजपचा मोर्चा निघणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मोर्चाचं नेतृत्व करणार  (Devendra Fadnavis Morcha) आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप मागणी करत आहे. भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. घटनेला १६ दिवस लोटूनही गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल मृत बाळांचे पालक तसंच नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. 8 जानेवारीला घडलेल्या या घटनेत 10 निष्पाप बाळांना जीव गमवावा लागला होता. चौकशी अहवालात कंत्राटी  नर्सवर ठपका ठेवण्यात आलाय. जिल्हा शल्य चिकित्सकासह दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलंय. मात्र कुणावरही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहेत. 

जिल्हा सामान्य रूग्णालयात ८ जानेवारीला रात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. या आगीतून ७ बालकांना वाचवण्यात आलं आहे. पण १० बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री २ वाजता ही आग लागली. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आऊटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं समोर आलं. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिला असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. 

अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. या आगीत आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली सात बालकं वाचवण्यात आली. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० बालकांचा मृत्यू झाला.भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. रा