पैशांचा पाऊस पाडण्याचं प्रलोभन देऊन युवतीचं शोषण

महाराष्ट्रातून धक्कादायक प्रकार समोर 

Updated: Mar 2, 2021, 03:34 PM IST
पैशांचा पाऊस पाडण्याचं प्रलोभन देऊन युवतीचं शोषण title=

नागपूर : नागपूरात भोंदूबाबा आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अंधश्रद्धेच्या बातम्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. पैशांचा पाऊस पाडण्याचं अमीष दाखवत अल्पवयीन मुलींचं शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डी आर उर्फ सोपान कुमरे असं अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्यासोबत टोळीला देखील अटक केलं आहे. 

भोंदूबाबासह विक्की खापरे, दिनेश निखारे, रामकृष्ण म्हसरकर व विनोद मसराम टोळीतील सदस्यही ताब्यात घेण्यात आले आहेत. भोंदूबाबाच्या मोबईलमध्ये पोलिसांना अनेक मुलींचे फोटो आढळळे आहेत. पोलिसांनी चिमूरमधून भोंदूबाबाला अटक केली आहेत. पोलिसांना भोंदूबाब सोपानच्यामोबईलमध्ये अनेक मुलींचे फोटोही आढळले आहे. (संतापजनक प्रकार : देवऋषीकडून उपचार देताना १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू) 

याप्रकरणी तक्रारदार अल्पवयीन मुलगी विक्कीच्या ओळखीची आहे. विक्कीनं त्या अल्पवयीन मुलीला आपल्याला भोंदूबाबकडे जायचं आहे तिथं तो आपल्या पैशांचा पाऊस पाडून देईल असं अमीष  दाखवलं. मात्र या अल्पवयीन  मुलीला शंका वाटल्यानं तीनं पोलिसांता धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला आहे. (अंधश्रद्धेमुळे ८ महिन्याच्या गरोदर महिलेचा मृत्यू) 

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत  भोंदबाबा व त्याच्या टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी चिमूर येथे जात या भोंदूबाबाला अटक केली असून या भोंदूबाबानं यापूर्वीही अनेक तरुणीचं शोषण केल्याची शक्यता आहे. त्यानं मुलींना आणण्यासाठी काही जणांना हाताशी धरले होते..त्याकरता तो मोठी रक्कम देत असल्याची माहितीही समोर आहे.