TET exam Scam | TET घोटाळा प्रकरणी 7 हजार शिक्षकांवर बडगा; पहिल्यांदाच यादी समोर, पाहा यात तुमचं नाव तर नाही?

टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Exam Scam) मोठी परीक्षा परिषदेकडून आली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Updated: Aug 4, 2022, 09:00 AM IST
TET exam Scam | TET घोटाळा प्रकरणी 7 हजार शिक्षकांवर बडगा; पहिल्यांदाच यादी समोर, पाहा यात तुमचं नाव तर नाही? title=

सागर आव्हाड, पुणे : टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Exam Scam) मोठी परीक्षा परिषदेकडून आली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (maharashtra state council of examiniation) कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळ्याबाबत झी 24 तासनं सर्वात आधी बातमी दाखवली होती. (zee 24 taas impact tet scam maharashtra state council of examiniation will taken action against 7 thousand 880 bogus teachers)

शिक्षक पात्रता परीक्षा 2019- 2020 मध्ये झाली होती. या परीक्षेत  गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. यानंतर पुणे सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीतून जे समोर आलं ते धक्कादायक होतं. तब्बल 7 हजार 880 उमेदवार गैरप्रकारात सहभागी असल्याचं समोर आलं आता या बोगस शिक्षकांना घरी पाठवलं जाणारं आहे.

ज्या शिक्षकांची सेवा रद्द करण्यात आली आहे. अशा 7 हजार 880 उमेदवारांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

-----

Edited by Tushar Sonawane