मुंबई : 'झी २४ तास'चा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट समोर येताच महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले असून, यामध्ये राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आली आहेत. कोण आहेत ते मंत्री पाहा...
शिक्षक भरती घोटाळा थेट सिल्लोडपर्यंत पोहोचला असून, मंत्र्यांच्या मुलीने एजंटला पैसे देऊन परीक्षा पास केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
शिक्षक भरती घोटाळा थेट सिल्लोडपर्यंत पोहोचला असून, मंत्र्यांच्या मुलीने एजंटला पैसे देऊन परीक्षा पास केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हे आहेत माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
काही दिवसांपूर्वीच 7880 उमेदवारांची यादी समोर आली. परिक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादिमध्ये हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलींचीही नावं समोर आली आहेत.
102 आणि 104 क्रमांकावर त्यांची नावं आहेत. सिल्लोडमधील एका संस्थेवर त्या दोघीही शिक्षिका असून त्या अपात्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. राज्यमंत्र्यांच्या मुलीच पैसे देऊन उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत असतानाच निकाल होण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला.
उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. दरम्यान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. या यादीमध्ये संभाजीनगर जिल्हय़ातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत.
या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आल्यामुळं आता या प्रकरणात पुढील कारवाई काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.