मुंबई : राज्यसेवा परीक्षेसाठी अनेक तरुण-तरुणी तयारी करत आहेत. राज्यसेवा परीक्षेत नंबर लागावा यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. राज्यसेवेच्या परीक्षा पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
2023 पासून बदलाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आता परीक्षेमध्ये वर्णनात्मक स्वरूपावर भर देण्यात आला आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचं स्वरूप आहे.‘एमपीएससी’ने ही माहिती दिली. . त्यामुळे परीक्षार्थींना केवळ घोकंपट्टी किंवा पुस्तकी किडा न होता सगळं ज्ञान घेणं आवश्यक ठरणार आहे.
नेमके काय बदल करण्यात आला?
- एकूण गुण 2,025 गुण
- मुलाखतीसाठी 275 गुण
-सुधारित परीक्षा योजनेमध्ये वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील.
- एकूण 9 पेपरचा समावेश असेल
-24 विषयांमधून उमेदवारांना वैकल्पिक विषय निवडता येईल
- सामान्य अध्ययनच्या 3 पेपरसाठी आंतरारष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यांची संबंधित विषयांचा अभ्यासक्रम
-सामान्य अध्ययन पेपर चार उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य, योग्यता विषयावर आधारित असतील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुढच्या वर्षीपासून मात्र परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर पुढच्या वर्षी परीक्षा देण्याच्या दृष्टीनं तयारी करत असाल तर आतापासूनच या सगळ्याचा अभ्यास सुरू करा.