राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर, अटक व्हायची शक्यता

 राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Updated: Jun 4, 2017, 04:53 PM IST
राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर, अटक व्हायची शक्यता title=

मुंबई : ईडीच्या गळाला आणखी एक मोठा राजकीय नेता लागल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिलीये. १०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा घोटाळा केल्या प्रकरणी ईडीने एका राजकीय नेत्यांशी संबंधीत कंपन्यांवर गुन्हा दाखल करुन लवकरच त्या राजकीय नेत्याविरोधात चौकशीचा फास आवळून त्या नेत्याला अटक करण्याच्या तयारीत ईडीचे अधिकारी आहेत, असं इडीच्या सुत्रांनी स्पष्ट केलंय.

१ कोटी रुपयांचे काम १० कोटी रुपयांना करुन अशा प्रकारे शासनाचे १०० कोटी रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी इडीने हा गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी चौकशीची सर्व कागदपत्रे ईडीने एसीबी म्हणजेच लाचलुचपत विभागाकडून मागवली आहे.

एसीबी तपास करत असलेल्या सिंचन घोटाळ्याचा आवाका हा भारताबाहेर जात असून काळा पैसा हवाला मार्फत परदेशात पाठवला असल्याचा दाट संशय एसीबी आणि इडीला आहे. आता ईडी सिंचन घोटाळ्याचा तपास करणार असल्याने ईडीने एसीबीकडून सर्व कागदपत्रे मागवलेत. तपास वेगाने व्हावा याकरता ईडी अटक सत्र सुरु करणार असल्याचे इडीच्या सुत्रांनी सांगितलय. त्यामुळे राज्यातील एक मोठा राजकीय नेता अडचणीत येणार आहे.