आताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक

पुण्यातील DRDO च्या  संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.  

Updated: May 4, 2023, 09:21 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक title=

पुणे : आताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) च्या संचालकाला एटीएसने (ATS) अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. DRDO चा संचालक हनीट्रॅपमध्ये (HoneyTrap) अडल्याची शक्यता आहे. संरक्षण संशोधन संस्थेचा संचालक पुणे इथल्या त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह (PIO) च्या हस्तकाशी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हॉट अॅपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात असल्याची माहिती आहे. (Mumbai ATS Arrested Pune DRDO Director)

DRDO च्या संचालकाने पदाचा गैरवापर करत त्यांचे अखत्यारित असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला (Pakistan Intelligence operative) पुरवल्याचा आरोप आहे. त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय गुपितं जी शत्रू राष्ट्राला मिळाल्यास भारतच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो अशी माहिती अनधिकृतरित्या शत्रू राष्ट्राला पुरवली. याबाबत दहशतवादी विरोधी पथकाने पाळत ठेवत त्याला अटक केली आहे. 

दहशतवाद विरोधी पथकाने केली कारवाई
डीआरडीओच्या संचालकांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. त्यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या संचालकाच्या निवृत्तीला सहा महिने राहिले उरले होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते  मोबाईलच्या माध्यमातून पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संपर्कात होते. 

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन संस्थेचं प्रमुख कार्यालय हे पुण्यात आहे. संरक्षण विभागातील महत्त्वाचं संशोधन हे पुण्यातील या कार्यालयातून होत असतं. पुण्यात सातत्याने दहशतवादाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतोय. अशा परिस्थितीत डीआरडीओचे संचालक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकत असतील तरी ती अतिशय गंभीर बाब आहे. अटक करण्यात आलेल्या संचालकाला कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे. 

डीआरडीओचं काम
भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करणं आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि त्याच्या विकासात  DRDO चं मोठे योगदान असतं. DRDO कडून देशाच्या संरक्षणासंबंधी विविध प्रकारचे संशोधन केलं जातं. देशाच्या संरक्षणासंबंधीच्या तंत्रज्ञानाला अधिक मजबूत करण्याचं काम डीआरडीओकडून केलं जातं.  डीआरडी ची स्थापना ही 1958 साली देशाच्या सैन्य शक्तीला अधिक बळकट बनविण्यासाठी केली गेली होती. ही संस्था देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. या संघटनेच्या आता 51 प्रयोगशाळा सुरू आहेत. ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, देशाच्या सुरक्षेसंबंधीची उपकरणे बनविणे इत्यादी क्षेत्रांत कार्यरत आहेत.