नागपूर : राज्यात एकीकडे गारपिटीने आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून चार जण जखमी झालेत.
गारपिटीचा तडाखा पिकांना बसला तसाच तो पक्ष्यांनाही बसला. काटोल तालुक्यात झालेल्या जोरदार गारपिटीत झाडांवर बसलेल्या बगळ्यांचा बळी गेला. झिलपा गावात अचानक झालेल्या गारपिटीत झाडांवर बसलेले सुमारे 60 बगळे मृत्युमुखी पडले.
पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी बगळ्यांना वाचवण्यासाठी आग पेटवली. टायर जाळून बगळ्यांना ऊब देण्यात आली. त्यामुळं सुमारे 100 बगळ्यांचे प्राण वाचले आहेत. विदर्भात 48 तासांत पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.