रत्नागिरीमध्ये १०८ रुग्णवाहिकेत तिळ्यांचा जन्म

१०८ रुग्णवाहिकेतच तिळ्यांना जन्म दिला आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2017, 09:12 AM IST
रत्नागिरीमध्ये १०८ रुग्णवाहिकेत तिळ्यांचा जन्म  title=

रत्नागिरी :  रत्नागिरीत एका महिलेने तीन बाळांना जन्म दिल्याची बातमी समोर येत आहे. प्रसूती कळा यायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करताना १०८ रुग्णवाहिकेतच तिळ्यांना जन्म दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील दख्खन या दुर्गम भागातली ही घटना आहे. 

पाली ग्रामीण रुग्णालयात  डॉक्टर नसल्याने प्रणाली जाधव हिची प्रसुती चक्क रुग्णवाहिकेत झाली. साखरपा ग्रामीण रुग्णालयातून ही महिला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यत प्रवास करताना हा प्रकार घडला आहे. जन्मावेळी या तीन बाळांचे अनुक्रमे ९०० ग्रॅम, ८०० ग्रॅम आणि ७७० ग्रॅम असे वजन होते. या बाळांचे वजन अत्यंत कमी आहे. त्यामुळे या तीन बाळांना उपचारासाठी कोल्हापूरच्या जिल्हातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रणाली  जाधव यांना आगोदर तीन मुली आहेत.तर आता ही तीळी झालेली तीनही मुलं आहेत. १०८ रुग्णवाहिकेत तिळ्यांचा जन्म झाल्य़ाची बहुदा ही पहिली घटना असल्याचे म्हटले जात आहे.