शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा, काँग्रेसला अपयश

शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा पडकला आहे. १७ पैकी  ९ जिंकत भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 14, 2017, 11:25 AM IST
शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा, काँग्रेसला अपयश title=
संग्रहित छाया

धुळे : शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा पडकला आहे. १७ पैकी  ९ जिंकत भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला ६ जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत.

शिंदखेडा नगरपंचायत अंतीम निकाल

भाजप - ०९ जागा

काँग्रेस - ०६ जागा

समाजवादी पार्टी - ०२ जागा

दरम्यान, या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपच्या  रजनी अनिल वानखेडे तीन हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या पालिकेवर सत्ता मिळविण्यात मोलाचा वाटा उचलाय.