...तर विधानसभेला कोण-कोणाचा घाम काढतो ते पाहू, दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार

'एक तर तुम्ही राजकारणात राहल किंवा मी तरी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 1, 2024, 02:34 PM IST
...तर विधानसभेला कोण-कोणाचा घाम काढतो ते पाहू, दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार title=

Pravin Darekar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या भाषणासंदर्भात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांनी राहावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. परंतु मला वाटतं उद्धव ठाकरे असं भावनिक नेहमी बोलत असतात. कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जोश देण्यासाठी असे प्रयत्न करत असतात. कार आता कार्यकत्यांचा तो जोश राहिला नाहीये. बाळासाहेबांच्या वेळीची शिवसेना आता राहिलेली नाही. त्यामुळे आता शिवसैनिकांमध्ये जीव आणण्याचा प्रयत्न आता उद्धव ठाकरे करत आहेत. मला वाटतं राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. हे असं झालं आहे की, शेताच्या बांदावरून जसे भाडणं सुरु असतात. जसे तुला बघून घेतो. एकतर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील. मला वाटत ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृत राजकारणाला शोभा देणारी नाहीये. 

त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचबरोबर तुमचं राजकारण काय आहे, हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना सत्तेचा वापर करून काय-काय केलं. मुंबईच्या पुलिस आयुक्त पांडेंना घेऊन तुम्ही काय केलं महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. ते राहिलेच ना, आणि सरकार देखील त्यांनी आणलं. या सगळ्याच तुम्ही आत्मपरीक्षण करा. देवेंद्र फडणवीस हे करून दाखवतात. बोलून नाही. अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.    

आम्हाला घाम वगैरे काही फुटला नाही. मात्र, विधानसभेला कोण-कोणाला घाम फोडतो. हे बघावे लागणार आहे. गुर्मीत बोलणारा दुसरं काय बोलू शकतो. आता गुर्मी कोण-कोणाची काढतं हे आपण आता कृतीतून दाखवू. बोलायला काय अक्कल लागत नाही. देवाने तोंड, जीभ दिली आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही पण बोलू शकतो. ठाकरेंना असं बोलणं ठाकरी बाणा वाटतं असेल तर त्यांना ते लखलाभ. अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?  

उद्धव ठाकरे महत्वाचं शब्द बोलले माझ्याकडे मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदान आहे... त्यामुळे तू राहील किंवा मी राहिल....उद्धव ठाकरे तुम्ही काय बोलतायत,तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकत आहे.... तुमची आणि फडणवीस यांची काय क्षमता आहे,,,, तुमची मानसिक दिवळखोरी जनतेने समजली आहे.... महाराष्ट्राची जनता आता तुम्हाला सोडणार नाही....  तुम्हाला जनता झोडपल्या शिवाय राहणार नाही.... ही चितावणी कुणाला देता, धारावी सारखे हत्याकांड होत आहे,,, समजता तेढ निर्माण करण्याचा काम उध्दव ठाकरे करत आहे.... हर हर महादेव कसे म्हणतात... महादेव यांनी असे सांगितले आहे का? .....भाजप अरेला कारे करणार... मोदींच्या भरवश्यावर तुमचे खासदार निवडणून आले आणि तुम्ही उपकार विसरले आहे. असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर केला आहे.