पालघरमध्ये आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

पालघर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.  

Updated: Mar 8, 2019, 05:17 PM IST
पालघरमध्ये आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध title=

ठाणे : पालघर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी छाणणीत आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. त्यामुळे भाजपच्या अलका राजपूत आणि गीता पिंपळे-संखे या दोघींची बिनविरोध निवड झाली. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकित शिवसेना आणि भाजप यामध्ये युती झाली आहे. भाजपच्या वाट्याला नऊ जागा आहेत. त्यामधील दोन जागांवर भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडणून आले आहेत. 

शिवसेना - भाजप युतीचा तिढा सुटला

पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी २४ मार्चला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवट दिवस होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना गर्दी झाली होती. निवडणुकीचा कोणीही अर्ज भरला नव्हता. त्यामुळे शेवटच्या दिवशी एकच गर्दी पाहायला मिळाली. आज उमेदवार अर्जाची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आघाडीच्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. त्यामुळे येथे भाजपला त्याचा फायदा झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या तीन पक्षात आघाडी झाली असून जागावाटप निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे शिवसेना भाजपमध्ये युती अशी निवडणूक होणार आहे. मात्र, आघाडीचे दोन अर्ज बाद झाल्याने आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला आहे.