महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे

चंद्रकांत पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला राग व्यक्त केला. 

Updated: Oct 2, 2018, 10:34 PM IST
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे title=
संग्रहित छाया

जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला राग व्यक्त केला. पाटील यांना आज भाषणादरम्यान धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. आरक्षणाची मागणी करत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

धनगर समाजाच्या 10 कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवून शेतकऱ्यांनी कर्जमाफी झालीच पाहिजे आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

चंद्रकांत पाटील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंबड येथे जालना-वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं उदघाटन केलं. याच कार्यक्रमातील भाषणादरम्यान अंबड शहरात हा प्रकार घडला.