पाव महागणार ; वडापाव, मिसळपाव, पावभाजी यांचे दरही वाढणार?

ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये उद्यापासून पाव महागणार आहेत.  

Updated: Aug 30, 2019, 11:40 PM IST
पाव महागणार ; वडापाव, मिसळपाव, पावभाजी यांचे दरही वाढणार? title=

ठाणे : जिल्ह्यात बदलापूरमध्ये उद्यापासून पाव महागणार आहेत. ८ पावांची लादी १५ ऐवजी १८ रुपये करण्यात आली आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे भाव वाढवण्यात आल्याचे कुळगाव बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोसिएशनने स्पष्ट केले आहे. 

पाव महागल्यामुळे आता शहरात वडापाव, मिसळपाव, पावभाजी यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत बेकरी मालकांच्या संघटनेने आज बंदही पाळला होता.