Aditya Thackeray big news : शिवसेनेत जी फूट पडली (split in shiv sena) या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thacekray) यांनी केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनी ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ''उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील'', अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला. (aditya thackrey on eknath shinde)
"राजकारण (politics) हे फार घाणेरडे ठिकाण नाही, किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी चिखलात जावे लागत नाही, असे आम्हाला वाटत होते. पण ती आमची चूक होती. असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं. मध्यावधीसाठी भाजपला दोष देणार का, असा सवाल त्यांनी केला असता आदित्य ठाकरे म्हणाले की मी त्यांच्यासारखे घाणेरडे राजकारण करत नाही. (Breaking News split in shiv sena aaditya thackrey admitted that he and udhhav thackrey both are the reason)
सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही,” असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. (Breaking News split in shiv sena aaditya thackrey admitted that he and udhhav thackrey both are the reason )