अमरावतीत बसपा कार्यकर्त्यांची पक्षाच्याच महासचिवांना मारहाण

बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला.

Updated: Jun 17, 2019, 07:33 PM IST
अमरावतीत बसपा कार्यकर्त्यांची पक्षाच्याच महासचिवांना मारहाण title=

अमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात बसपाच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. या परभवाची समीक्षा करण्यासाठी बसपा तर्फे आज विश्रामगृह येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला. बैठकीसाठी आलेले महाराष्ट्र निवडणूक प्रभारी संदीप ताजने आणि राष्ट्रीय महासचिव प्रमोद रैना यांना चांगलीच मारहाण केली.

बैठक सुरु होताच कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील परभवाला जवाबदार असल्याचे सांगून उपस्थित नेत्यांवर आरोप सुरु केले. त्यानंतर सभागृहातिल खुर्च्या व टेबल फेकण्यात आल्या तसेच संदीप ताजने यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. 

अखेर ताजने यांनी एका खोलीत स्वतःला बंद करुन आपला बचाव केला. मात्र यावेळी प्रचंड गोंधळ हा सुरूच होता. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले व खोलीत लपलेले बसपा प्रभारी बाहेर पडले.