close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मॅच जिंकल्याच्या आनंदात फेसबुक लाईव्ह भावांच्या जीवावर बेतले

दोन्ही मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे कैलाशनगरमधील पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Updated: Jun 17, 2019, 05:36 PM IST
मॅच जिंकल्याच्या आनंदात फेसबुक लाईव्ह भावांच्या जीवावर बेतले

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : फेसबुक लाईव्हनं नागपुरातील दोन भावंडांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत-पाकिस्तान मॅचचे फेसबुक लाईव्ह करताना अपघात होऊन दोन भावांचा जीव गेला आहे. पुंकेश व संकेत पाटील असे या मृत्यूमुखी पडलेल्या भावडांचे नाव आहे. फेसबुक लाईव्ह स्क्रिनिंग आणि पुल पार्टीकरत गाडीने जात असताना हा अपघात झाला. पुंकेश व संकेत त्यांच्या सात मित्रांसह काटोल मार्गावरी एका रिसोर्टमध्ये  भारत-पाकिस्तान मॅचचं लाईव्ह स्क्रिनिंग आणि पुल पार्टीचा आनंद लुटण्यासाठी जात होते. कारमधील आपली मस्ती आणि प्रवास इतरांना कळावी म्हणून त्यांनी गाडी चालवताना फेसबुक लाईव्ह सुरु केलं. हे फेसबुक लाईव्ह सुरु असताना कार भरधाव वेगानं चालवण्यात येत होती. हातला शिवराजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित झाली आणि या अपघातात पुंकेश आणि संकेत या भावडांचा अपघतात मृत्यू झाला. तर सोबतचे सात तरुण जखमी झाले. हे तरुण कारमध्ये फेसबुक लाईव्ह करत असल्याचं काटोल पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल बोंद्रे यांनीही स्पष्ट केले आहे. 

दोन्ही मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे कैलाशनगरमधील पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुंकेश मिहानमध्ये नौकरीला होता. पुंकेश आणि संकेत हा आपल्या वृद्धापकाळात आधार होतील अशी आशा बाळगून होते. मात्र  आई-वडिलांना दोन्ही मुलं अपघातात गेल्याचं कळल्यापासून पु्र्णपणे ते पूर्णपणे खचले आहेत. .नागपुरात या घटनेमुळ हळहळ व्यक्त होतं आहे.त्यांचे मित्रही या घटनेमुळे सुन्न झाले आहे.पुंकेशचा मित्र शूभम थूललाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे...मला काम असल्यामुळे त्यांच्यासोबत गेलो नसल्याचंही त्यांने सांगितलं.नागपुरात यापूर्वीही सोशल मीडियावर लाईव्ह करतना तारतम्य न बाळगल्यानं तरुण-तरुणींनी जीव  गमावले आहे.

जुलै 2017 मध्ये वेणा जलाशयात बोट बुडून आठ तरुणांचा मृत्यू झाला होता. हतरुण बोटीत बसून फेसबुक लाईव्ह करत होते. तर 16 फेब्रुवारी 2018 मध्ये नागपूर- अमरावती मार्गावर वाडीजवळ  अपघातात 7 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. हे विद्यार्थी अपघातापूर्वी कारमध्ये करत होते इंस्टा लाईव्ह करत होते. अशा घटनांतून सोशल मीडियाचा वापर करताना तरुणाई भान हरपत चालल्याचे दिसून येते. 

कुठे, कसं व किती वेळ वापराव याचं तारतम्यचं तरुणाईला राहिलेलं नाही. त्यात गाडी चालवताना त्यांचा अतिउत्साह व फेसबुक लाईव्ह करत त्यावर मिळणाऱ्या लाईक्स, क्रेझ अनेकदा घातक ठरत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ निखिल पांडे यांनी सांगितले.

त्यामुळे पालकांनी मुलं किती वेळ व कसा सोशल मीडियाचा वापर करतात याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. अतिउत्साह व  वाहन चालवताना सोशल मीडियाच्या वापरामुळे जर अपघात झाला तर त्याचे परिणाम कुटुंबाला देखील सहन करावे लागतात याच भान तरुणाईने ठेवायला हवे.