ज्याला जिवलग मित्र मानायचा त्यानंच ठेवलं पत्नीसोबत अफेअर, एका हत्येनं बुलढाणा हादरलं

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 31, 2023, 01:49 PM IST
ज्याला जिवलग मित्र मानायचा त्यानंच ठेवलं पत्नीसोबत अफेअर, एका हत्येनं बुलढाणा हादरलं title=
Buldhana Crime News Man Killed His Friend Over extra marital affairs With His Wife

Buldhana Crime News: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पती-पत्नीमधील वाद आणि त्यातून घडणारे गुन्हे याचे प्रमाणही वाढले आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार तालुक्यातील पळसखेड येथे 29 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. राजाराम जायभाये असं मृत तरुणाचे नाव असून संतोष मदन थोरवे यानेच त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात संतोष याचा ताब्यात घेतले असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने संतोषने राजाराम यांची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम आणि संतोष हे दोघं जिवलग मित्र होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. त्याचवेळी संतोष याचा राजारामाच्या पत्नीवर जीव जडला. दोघांमध्येही प्रेमसंबंध निर्माण झाले. पण दोघांच्या अनैतिक संबंधात राजाराम अडचण ठरत होता. त्यामुळं संतोष यांने राजारामाचा गळा दाबून खून केला. 

28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे राजाराम संतोषच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी केला. मात्र, बराच काळ उलटूनही तो परत न आल्याने घरात एकच शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर राजाराम संतोषच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला. राजारामने शेतात आत्महत्या केल्याची बातमी सगळीकडे पसरली. मात्र, याबाबत राजारामच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. तसंच, संतोष आणि राजारामची पत्नी यांच्यावर आरोप केला होता. 

राजाराम यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी संतोष थोरवे याची चौकशी करत त्याला ताब्यात घेतले आहे. लोणार पोलिसांनी आरोपीला अटक करुन कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. 

पुण्यात प्रेमीयुगलाचा मृत्यू

अहमदनगरचा तरुण आणि पुण्याची तरुणी दोघांचेही मृतदेह पुण्यातील वाघोली येथील एका लॉजवर आढळले आहेत. या प्रेमीयुगलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी,पुणे) आणि सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी,भिंगार,अहमदनगर) असं आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.