बुलडाणा : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही बुलडाणा जिल्ह्यातील फर्दापूर या गावामध्ये एस टी बस आली नसल्याने गावातील शाळकरी मुलांनी परिवहंन मंत्री दिवाकर रावते प्रसन्न व्हावेत यासाठी त्यांच्या प्रतिमेचा अभिषेक केल्याची बातमी सर्वप्रथम झी मिडीयाने दाखवली होती. झी मिडीयाच्या या बातमीनंतर आठवडाभरातच स्थानिक अगराकडून एस टी बस सुरु करण्यात आली आहे.
फर्दापूर या गावातून अनेक विद्यार्थी मोताळा तसेच बुलडाणा याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात परंतु एस टी बस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असत . परंतु झी मिडीयाच्या बातमीमुळे आता विद्यार्थ्यांना होणारी मोठी अडचण दूर झालेली आहे.