बैलाला ठार करणारे नराधम सापडले

घटना इंदापूरच्या पोंदवडी गावातील   

Updated: Nov 19, 2019, 07:48 PM IST
बैलाला ठार करणारे नराधम सापडले

इंदापूर : जेसीबीनं चिरडून बैलाची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध पोलिसांना लागला आहे. रोहित शिवाजी आटोळे आणि भाऊसाहेब अण्णा खारतोडे यांच्याविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातल्या पोंदवडी गावातील असल्याचं स्पष्ट झालं. आरोपींना जेरबंद करण्यासाठी दोन पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. 

सोमवारी माणूसकीला काळीमा फासणारा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अखेर असे कृत्य करणारे पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. क्रूरता कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकते त्याचा एक व्हिडिओ सोमवारी समोर आला. बैल पिसाळला म्हणून अत्यंत क्रूरपणे त्याला जेसीबीनं मारण्यात आलं.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पशुवैद्यकीयांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने इंजेक्शन देवून किंवा वन खात्याच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळवता आले असते. असे मत त्यांनी मांडले.