'पेटा'वर बंदी घालण्यासाठी बैलगाडा मालकांचे आंदोलन

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बैलजोड्या परत नेणार नाही,अशी भूमिका बैलगाडा मालकांनी घेतलीय.  

Updated: Mar 13, 2018, 11:14 PM IST
'पेटा'वर बंदी घालण्यासाठी बैलगाडा मालकांचे आंदोलन title=

पुणे : मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बैलजोड्या परत नेणार नाही,अशी भूमिका बैलगाडा मालकांनी घेतलीय.  

महाराष्ट्र प्राणी कल्याण बोर्डवर अशासकीय सदस्य असलेले एन.जी. जयसिम्हा यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी. पेटा संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी तसंच या संस्थेवर बंदी घालण्यात यावी. या बैलगाडा मालकांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी बैलगाडा मालकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलंय.

राज्य सरकारनं बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी. अशी मागणी बैलगाडा मालकांनी केलीय. बैलगाडा मालकांनी आपल्या शेकडो बैल जोड्यासंह आंदोलनात सहभागी झालेत. अनेक बैलगाडा मालक बैलांची वाजता गाजत मिरवणूक काढत आंदोलनात सहभाग घेतला. 

Tags: