रायगड : मुबंई गोवा महामार्गावर ईर्टिगा गाडी जळुन खाक झाल्याची घटना समोर येत आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी नाही. कोकणातुन मुबंईकडे जाणाऱ्या ईर्टिगा कारला अचानक आग लागली. पेण जवळील हमरापुर येथील पुलावर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण मात्र समजु शकले नाही. गाडीला आग लागल्याचे वृत्त कळताच पुढच्या काही वेळातच अग्नी शमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे आग वेळीच आटोक्यात आली. गाडीतील एकमेव प्रवासी शंकर जाधव हे थोडक्यात बचावले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकुर यांच्या सतंर्कतेमुळे वाहतुक पोलीस आणि पोलीस, फायर ब्रिगेड टिमला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे काही काळ वाहतुकीला अडथळा झाला होता. आता रस्त्यावरील वाहतूक पुर्व स्थितीत आहे.