लवासा घाटात बसला अपघात, मृत्यू समोर उभा होता पण...

 लवासा घाट रस्त्यावर एका बसला भीषण अपघात झाला. परंतु, दैव बलवत्तर म्हणून या बसमधील सगळे प्रवासी मात्र सुखरुप आहेत. 

Updated: Aug 16, 2017, 10:35 AM IST
लवासा घाटात बसला अपघात, मृत्यू समोर उभा होता पण...  title=

पुणे : लवासा घाट रस्त्यावर एका बसला भीषण अपघात झाला. परंतु, दैव बलवत्तर म्हणून या बसमधील सगळे प्रवासी मात्र सुखरुप आहेत. 

संरक्षक कठडे तोडून ही बस डोंगराच्या कड्याच्या दिशेने गेले. मात्र, बसची चाकं दगडात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. गुजरातमधील सुरत इथून पन्नास पर्यट खासगी प्रवासी बसमधून वरसगाव धरण भागातील दासवे इथल्या लवासाकडे जात होते. 

टेमघर धरणाच्या शेजारील लवासा घाट रस्त्याची दोन वळणे ओलांडून तिसऱ्या वळणांवर बसचे ब्रेक फेल झाल्यानं ही दुर्घटना घडली. डोंगर कड्याच्या दिशेने खाली गेलेली ही बस चाकांमुळे अडकली. बसचा पुढचा भाग खाली आणि पाठीमागचा भाग वर उचलला गेला. 

त्याच वेळी कारमधून जात असलेल्या काही जणांना बस दरीच्या दिशेने जात असल्याचं दिसून आलं. त्यांनी तात्काळ बसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने बसमधील सगळ्या पन्नास जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

समोर मृत्यू उभा असताना त्यातून सुखरुप सुटका झालेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यांत काहीजण किरकोळ जखमीही झालेत.